आरोग्याचे ‘बाळ’कडू : दमा आणि उपचार

धूळ, प्रदूषण व ॲलर्जीमुळे वाढणारा दमा योग्य काळजी, प्रतिबंध आणि इन्हेलर उपचारांनी नियंत्रणात ठेवता येतो.
Causes and Triggers of Asthma in Children

Causes and Triggers of Asthma in Children

Sakal

Updated on

डॉ. संजय जानवळे - बालरोगतज्ज्ञ

लहान मुलांमधील दम्याशी संबंधित काही गोष्टींबाबत आपण गेल्या आठवड्यात माहिती घेतली. आता इतर गोष्टींचा विचार करू.

दम्याबाबतची काही कारणे आपण बघितली. इतर कारणेही त्याला कारणीभूत ठरू शकतात. घरातील धूलिकणावर असलेले किटाणू हे दम्यास कारणीभूत ठरणारे ट्रिगर असल्याचे दिसून आले आहे. हे किटाणू गालिचे, गाद्या, सोफे, पडदे अन् अगदी खेळण्यांमध्येही असतात. कार्पेट्सचा वापर करणे टाळा अथवा त्यांची नियमित साफसफाई करा. अंथरुणावर खेळणी ठेवू नका. दर दोन आठवड्यांनी ती धुवा आणि सूर्यप्रकाशात नीट वाळवा. पाळीव प्राणी, त्यांचे केस, पिसे, लाळ, त्वचेवरचे थर हे दम्याचे कारण बनू शकते. सिगारेटचा धूर, कारमधून निघणारा धूर, फटाक्यांचा धूर, स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाचा धूर यासारखे ट्रिगर्स वायूनलिका उत्तेजित करू शकतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com