मुलांमधील स्वमग्नता

लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे स्वमग्नता या विषयी आपण गेल्या आठवड्यात काही गोष्टी समजून घेतल्या. आता इतर काही गोष्टी समजून घेऊ.
Autism in Children

Autism in Children

sakal

Updated on

- डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ

लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे स्वमग्नता या विषयी आपण गेल्या आठवड्यात काही गोष्टी समजून घेतल्या. आता इतर काही गोष्टी समजून घेऊ.

ऑटिझम होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. काही आनुवंशिक घटकामुळे किंवा मेंदूला झालेल्या इजेमुळे हा विकार होण्याची शक्यता असते. संगोपन करताना पालकांनी केलेल्या चुकांमुळे तो होतो किंवा लहानपपणी दिलेल्या लशींचा तो दुष्परिणाम असतो, असे नाही. डीएसएमव्हीच्या मापदंडानुसार एएसडी (ऑटिझम स्पेक्ट्रम डिसॉर्डर) हा विकारांचा एक स्पेक्ट्रम असून त्यात स्वमग्नता, ॲस्परजर्स सिंड्रोम, आणि परव्हॅसिव डेव्हलपमेंट डिसॉर्डर यांचा समावेश होतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com