तर काय?

बाळांच्या आहारापासून प्रौढांमधील गॅसच्या त्रासापर्यंत आयुर्वेदिक उपायांबाबत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
Natural Remedies to Improve Digestion

Natural Remedies to Improve Digestion

sakal

Updated on

प्रश्न : माझं बाळ तीन महिन्याचं आहे. त्याला संतुलनचे चैतन्यकल्प व बाल हर्बल सिरप हे कधीपासून देता येते? एकाच वेळेला हे दोन्ही चालू ठेवलं तर चालू शकेल का? तसेच बाल हर्बल सिरप सुरू केले तर बालामृत बालगुटी बंद करायची का चालू ठेवायची? कृपया याबद्दल मार्गदर्शन करावे.

~ किशोरी धावडे

उत्तर : बाळाला बाहेरचे दूध अर्थात गाईचे दूध द्यायला सुरू केल्यापासून चैतन्यकल्प देता येऊ शकते. साधारणपणे चार ते सहा महिन्यांच्या वयोगटातल्या मुलांना बाहेरचे दूध सुरू करणे योग्य असते. सुरुवातीला चैतन्यकल्प व्यवस्थित मिसळून वस्त्र काळ करून दूध द्यायला सुरू करावे. सकाळ संध्याकाळ एक एक चमचा चैतन्यकल्प दिलेले उत्तम ठरते. संतुलनचे बाल हर्बल सिरप हे बाळाच्या पचनाकरता मदत करतात. त्यामुळे बाहेरचे दूध किंवा बाहेरचे अन्न हे सुरू केल्यानंतर बाल हर्बल सिरप देण्याची गरज पडते. स्तन्यपान करत असताना गॅसेस वगैरेचा काही त्रास होत असला तर तो सहसा बाळगुटीने कमी होतो; पण फार प्रमाणात त्रास होत असला तर अशा वेळेला बाल हर्बल सिरपसुद्धा सुरू केलेले चालते. बाळगुटी विकासाकरितासुद्धा मदत करते म्हणून ती साधारणपणे बाळ बारा महिने ते पंधरा महिन्याचं होण्यापर्यंत द्यावे. तसेच बालामृत रसायन असल्यामुळे कमीत कमी दोन वर्ष ते शक्य झाल्यास पाच वर्षाच्या वयापर्यंत दिलेले उत्तम ठरते. ह्या चारही गोष्टी एकत्र दिल्यास काही हरकत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com