

The Healing Power of Sun: More Than Just Daylight
Sakal
‘संध्याकाळचा बाहेर जातो आहेस, रात्री परत येताना थंड वारा डोक्याला व कानाला लागेल, तेव्हा मफलर व स्वेटर घेऊन जा’, अशा तऱ्हेचा सल्ला ऐकू येऊ लागला की थंडीचे दिवस आले आहेत असे कळते. ऋतू थंडीचा असला तरी दिवसा थंडीचे फार कौतुक होत नाही, कारण आकाशातील सूर्य फारसा प्रखर नसला तरी तो सगळ्यांना तापवत ठेवतो, म्हणजेच ऊब देतो. हिलस्टेशनला, डोंगरावर वगैरे गेले तर तेथे एकूणच वारं जास्त असल्यामुळे सूर्य असला तरी दिवसाही थंड वाटते. तेथे झाडी वगैरे वाढलेली असली तर त्यामुळेही वातावरण थंड राहते.