

The Science of Til-Gul: Boosting Physical and Mental Strength
Sakal
डॉ. मालविका तांबे
जानेवारीच्या महिन्यातला आपला सगळ्यात पहिला सण म्हणजे संक्रांत. ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ अशा वाक्याने या सणाचं महत्त्व आपल्याला सांगितलं जातं. गेले काही दिवस सगळीकडे असलेलं मस्त थंड वातावरण, पचनाग्नीची उत्तम कार्यक्षमता, निसर्गात असलेली समृद्धी ही हळूहळू आता कमी होणार आहे, याची आठवण आपल्याला या सणाच्या निमित्ताने होते. आता उरलेल्या मस्त गुलाबी थंडीच्या वेळेत आपल्या शारीरिक व मानसिक सामर्थ्यावरती काम करून घेण्याची संधी सोडू नये.