तर काय ?

सुवर्ण संस्कार आणि आयुर्वेदिक उपायांचा उपयोग करून संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुधारण्याचे सोपे मार्ग. कावीळ नंतर पोटाचे संतुलन राखण्यासाठी उपयुक्त आहार आणि घरगुती उपाय.
Importance of Gold in Ayurveda

Importance of Gold in Ayurveda

Sakal

Updated on

प्रश्न : तुमच्या सगळ्या लेखांमध्ये सुवर्ण संस्काराला खूप महत्व दिलेलं आहे. पण सध्या सोने खूप महाग आहे. कुटुंबात चार ते पाच सदस्य असल्यास सगळ्यांना सोन्याचा उपयोग कसा करून घेता येईल? कृपया याबद्दल मार्गदर्शन करावे.

- शिवाजी जाधव, बारामती

उत्तर : आयुर्वेदामध्ये सुवर्ण हे एक उत्तम रसायन सांगितलेले आहे व त्याचे खूप वेगवेगळ्या प्रकारे शरीरामध्ये उपयोग करून घेता येतात. उदाहरणार्थ, लहान मुलांना सुवर्ण किंवा सुवर्ण भस्म हे देणं अत्यंत गरजेचं असतं. तशा प्रकारच्या सुवर्णप्राशन संस्काराकरिता संतुलन बालामृत हे मुलांना वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत तरी कमीत कमी द्यावे. सोन्याच्या भांड्यामध्ये गरम पाणी ठेवावे व नंतर ते प्यायला घ्यावे. आजच्या काळात सोन्याचे भांडे किंवा चांदीचे भांडे घेणं अवघड झालेलं आहे. संपूर्ण कुटुंबाकरिता जर का संतुलन अमृत शर्करायुक्त पंचामृत घेणे अवघड पडत असेल तर त्याच्याकरता सुवर्ण सिद्ध जल प्राशन हा अतिशय कमी खर्चात घरच्या घरी करण्यासारखा उपाय असतो. यासंबंधित विडियो ''डॉ.मालविका तांबे'' युट्यूब चॅनल वरती मिरॅकल वाटर नावाने प्रसिद्ध केलेला आहे. तो नक्की बघावा.अर्थातच सुवर्ण प्रत्यक्ष खाणे हे सुवर्ण संस्कारित जला पेक्षा जास्त प्रभावकारी आहे. पण तरीसुद्धा अगदीच काही न घेण्यापेक्षा किमान सुवर्ण संस्कारित जल सगळ्यांनी घरात घेतलं तर त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम नक्कीच दिसू शकेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com