Ayurveda Tips:आयुर्वेदानुसार दूधासोबत चुकूनही 'या' गोष्टी खाऊ नये... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ayurveda tips

Ayurveda Tips:आयुर्वेदानुसार दूधासोबत चुकूनही 'या' गोष्टी खाऊ नये...

Milk: दूध प्राचीन काळापासून पौष्टिकतेची खाण मानलं गेलंय. दूध प्यायल्याने एकच लाभ होत नाही तर असंख्य लाभ होतात. ऋषी मुनींच्या काळापासून चांगल्या स्वास्थासाठी दुधाचे सेवन केले जात आहे. आजही गावाच्या ठिकाणी गायीचं ताज दूध काढून पिणे अति लाभदायक मानले जाते. दुधामध्ये जीवनसत्त्व, खनिज पदार्थ आणि शरीराला मजबूत करणारे अनेक पोषक तत्वे असतात. दुध हे पौष्टिकतेची मोठी संपन्न खाण आहे हे आम्ही मगाशीच सांगितलं. उच्च दर्जाची प्रथिने आणि जीवनसत्त्व 'ब' च्या व्यतिरिक्त दुधात कॅल्शियम, जीवनसत्त्व 'ड' असते जे हृदय सुदृढ राखतात आणि आपले वजन सुद्धा नियंत्रित ठेवण्यात मदत करतात. दुधामध्ये पोटॅशियम फॉस्फरस, मॅग्नेशियम, अँटीऑक्सीडेंटससुद्ध असतात. यामुळे हाडे आणि दात अतिशय मजबूत राहतात. 

दुध आपल्या आरोग्यासाठी इतकं फायदेशीर असूनही दुधासोबत काही गोष्टींचं सेवन करणं निषिद्ध आहे. वास्तविक, असे काही पदार्थ आहेत, ज्यात दुध मिसळल्याने शरीराला हानी पोहोचते. आयुर्वेदानुसार दूध प्यायल्यानंतर या गोष्टींचे सेवन केल्यास पित्त दोष वाढतो. यासोबतच पचनाशी संबंधित समस्याही वाढतात. 

चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या दूध प्यायल्यानंतर त्याचे सेवन करू नये याविषयी माहिती पाहू या...

हेही वाचा: Datta Jayanti 2022: दत्तात्रेय यांचे 52 श्लोकी गुरुचरित्र...

1) दूध प्यायल्यानंतर चुकूनही फणस या फळाचे सेवन करू नका. तुम्ही जर का फणस खाल्ल्यानंतर लगेच दूध सेवन केले तर तुम्हाला त्वचा आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. 

2) दूध प्यायल्यानंतर ताबडतोब जॅकफ्रूट खाल्ल्याने सुध्दा त्वचेवर पुरळ, खाज आणि सोरायसिस होऊ शकतो. त्याचा पचनावरही परिणाम होऊ शकतो.

3) केसांपासून ते सुंदर त्वचेपर्यंत मासे खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की दुधासोबत मासे कधीही खाऊ नयेत. मासे खाल्यानंतर दूध प्यायल्यास पचनाच्या समस्या जसे की अन्नातून विषबाधा, पोटदुखी इत्यादी, तसेच त्वचेवर पांढरे डाग पडू शकतात. मात्र, माशानंतर दूध न पिण्याचे कोणतेही शास्त्रीय कारण नाही.

हेही वाचा: Winter Recipe : मुलांसाठी बनवा हेल्दी टेस्टी गाजर फ्रेंच फ्राइज

4) दूध आणि दही खाल्ल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. परंतु हे दोन्ही एकत्र सेवन करण्याचा सल्ला दिला जात नाही. दूध आणि दही दोन्ही एकत्र किंवा एकापाठोपाठ सेवन केल्यास पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होतो. ज्यानंतर ओटीपोटात दुखणे आणि उलट्या होणे यासारखी लक्षणे दिसतात.

5) लिंबूवर्गीय फळांसह दूध पिण्याचे देखील सल्ला दिला जात नाही. ते खाल्ल्याने उलट्या होऊ शकतात. या दोन गोष्टी एकत्र घेतल्यास आरोग्यावर खूप विपरीत परिणाम होतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही लिंबूवर्गीय फळे खातात तेव्हा कमीत कमी दोन तासांनंतरच दुधाचे सेवन करा.

6) उडीद डाळ आणि दूध एकत्र किंवा थोड्या वेळाने सेवन केल्याने तुमचे गंभीर नुकसान होऊ शकते. त्यामुळे पचनक्रिया बिघडणे, मळमळ, उलट्या होणे, शरीरात जडपणा जाणवणे, पोटदुखी अशी लक्षणे दिसू लागतात. उडीद डाळ खाल्ल्यानंतर किमान दोन तासांनी दूध प्यावे.

या दुष्परिणामापासुन तुम्हाला तुमचा बचाव करायचा असेल तर दूधासोबत वरील गोष्टीचे सेवन करणे टाळावे.