तर काय..?

सततचा सर्दी, खोकला, ताप आणि टॉन्सिल्सचा त्रास असलेल्या १० वर्षांच्या मुलाकरिता रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोज सकाळी गरम पाणी, हळदीचे दूध, सितोपलादी चूर्ण, च्यवनप्राश, सेन रोज रसायन आणि नाकात नस्य सेन घृत वापरण्याचे आयुर्वेदिक उपाय सुचवले आहेत.
A Comprehensive Ayurvedic Routine Involving Sitopaladi and Nasya for Your Ten-Year-Old.

A Comprehensive Ayurvedic Routine Involving Sitopaladi and Nasya for Your Ten-Year-Old.

Sakal

Updated on

माझा मुलगा दहा वर्षांचा आहे. त्याला सारखा टॉन्सिल्सचा त्रास होत राहतो. गेल्या वर्षभरात सतत सर्दी, खोकला, ताप आणि टॉन्सिल्सच्या त्रासाने तो बेजार झालेला आहे. कृपया त्याच्याकरिता उपाय सुचवावेत.

- कविता भोर, मुंबई

उत्तर : मुलाला रोज सकाळी उठल्यावर एक कप गरम पाणी पिण्याची सवय लावावी. तसेच दिवसभरातून एकदा तरी हळदीचे दूध व्यवस्थितरीत्या तयार करून दिलेले उत्तम. हळदीचे दूध कसे तयार करावे याचाकरता डॉ. मालविका तांबे यूट्यूब चॅनलवरती हळदीचा व्हिडिओ बघणं उत्तम राहील. रोज सकाळी अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण एक ग्लासभर पाण्यामध्ये मिसळून ठेवावे. त्याला घोट घोट करून ते पाणी प्यायला सांगावे. तसेच खूप जास्त त्रास असताना संतुलन चे सितोपलादी चूर्ण मधाबरोबर मिश्रण करून अर्धा अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ घेतलेले चांगले. रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्याच्या दृष्टीने त्याला रोज संतुलन च्यवनप्राश व सेन रोज हे रसायन सुद्धा दिलेले उत्तम राहील. नाकामध्ये रोज, संतुलन नस्य सेन घृत घालावे. आयुर्वेदिक औषध प्रकृतीप्रमाणे नियोजन केल्यास अश्या प्रकारचे त्रास पूर्णपणे बंद करता येतात. त्याच्याकरिता प्रत्यक्ष तज्ज्ञांचा सल्ला घेणंसुद्धा उत्तम राहील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com