
Why We Shouldn't 'Shoot the Messenger' (Cholesterol) and Focus on Fixing the Underlying Digestive Issues (Aam).
Sakal
डॉ. मालविका तांबे
आधुनिक जीवनशैली ही सध्या संपूर्ण समाजामध्ये वेगवेगळ्या आजारांना वाव देत आहे. तरुण पिढी रोज नव्या नव्या समस्यांशी झुंज देत आहे. त्यांच्यामध्ये एक सगळ्यात कॉमन त्रास दिसतोय तो म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढणे. हा कोलेस्ट्रॉल. खरंतर शरीराच्या चयापचय क्रियेतला एक खूप महत्त्वाचा भागीदार असतो. पण याची पातळी सामान्यापेक्षा जर का जास्त प्रमाणात वाढली तर ते शरीरात कुठेतरी चूक होती आहे याचं द्योतक असतं. पण सध्या चूक होतीये सांगणारा दूत आहे त्यालाच गोळी मारून संपवलं जातंय. कोलेस्ट्रॉल वाढला म्हणजे हृदयरोग होणारच अशा प्रकारचा समज समाजात सगळीकडे पसरलेला दिसतो. कोलेस्ट्रॉलची सामान्य पातळी २00 पर्यंत चालते, असं माहिती असतानासुद्धा २०० चे २०५ कोलेस्ट्रॉल झाला की लोकांची रात्रीची झोप नाहीशी होते आणि मग कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लोकांचा प्रयत्न सुरू होतो. त्याच्याकरिता गोळ्या घेणं, संपूर्णपणे तेल, तूप इत्यादीवर बंधन घालणे व ते कोलेस्ट्रॉल जितकं कमी असेल तितकं चांगलं अशा प्रकारची समजूतसुद्धा समाजामध्ये दिसते.