

Improving Milk Digestion in Children: Ayurvedic Remedies
Sakal
प्रश्न : माझी मुलगी सहा वर्षांची आहे आणि तिला दूध प्यायला मनापासून आवडतं. पण दूध प्यायल्यावर तिच्या पोटात दुखतं, तसेच मळमळ सुरू होते व बऱ्याचदा शौचाला अपातळसुद्धा होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने तिचं दूध बंद केलं की काही त्रास होत नाही. आणि तिची फार दूध प्यायची इच्छा असते. दुधाच्या पचनाकरिता काय करता येऊ शकेल? कृपया सांगावे.
- श्वेता अंजलकर, मुंबई
उत्तर : सध्याच्या काळात दूध खूप प्रक्रिया करूनच बाजारामध्ये मिळत असतं. अल्ट्रा हिटेड, होमोजनायझेशन, गायींना दिलेली विविध रासायनिक औषधे, या सगळ्यांमुळे दूध पचणं अवघड होत चाललेलं आहे. शक्य असल्यास भारतीय वंशाच्या गायींचं दूध दूधवाल्याकडून घेण्याचा प्रयत्न करावा. असे चांगल्या प्रतीचे दूध एक कप घेऊन त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी व अर्धा चमचा सुंठ पूड घालून उकळायला ठेवावे. उकळून फक्त दूध राहिल्यावरती त्याला गाळून त्याच्यामध्ये संतुलन शतानंत कल्प घालून मुलीला प्यायला द्यावे. सुरुवातीला कमी प्रमाणात दिले तरीही चालू शकते. ह्याच्यानेही दूध न पचल्यास दुधाबरोबर सुंठ व वावडिंग दोन्ही घालून उकळावे. वावडिंगामुळे दुधाला थोडासा कडसरपणा येतो. तो बऱ्याचशा मुलांना आवडत नाही. त्यामुळे हा उपाय सुंठीने नुसतं काम न झाल्यास मगच वापरावा. तसेच तिचं पचन सुधारण्याच्या दृष्टीने तिला रोज संतुलन बाल हर्बल सिरप हेही सकाळ संध्याकाळ नियमाने द्यावे. मुलांकरता वाढत्या वयामध्ये दूध हे खूप महत्त्वाचे असते. त्याच्यामुळे मुलांना दूध आवडत असलं नसलं तरीसुद्धा आवर्जून त्यांना दूध देणे गरजेचे असते. बरेचशे पालक विचार करतात की दूध पचत नसलं तर त्याच्या जागी दही दिले तरी चालू शकते. पण दुधाची सर कशालाच येत नाही. दूध पिणे शक्य नसल्यास नाचणी ची खीर, कणकीचा किंवा रव्याचा शिरा, गव्हाची लाप्शी हे दुधामध्ये करून मुलांना खायला द्यावे. पोळीची कणिक पण दुधात मळली तर मुलांच्या पोटात दूध जायला मदत होऊ शकते. मुलांना दूध पीता येईल त्याच्याकरता प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक असते. हे सगळं करून जर का दूध पिणे शक्य झालं नाही, प्रत्यक्ष वैद्यांना भेटून मार्गदर्शन घ्यावे.