
प्रश्र्न १ : मी गरोदर आहे, गेल्या महिन्यापासून माझ्या नाकाचा आकार वाढताना दिसतो आहे, व त्यावर काळे डाग व पुटकुळ्या येताना दिसत आहेत. तसेच माझ्या पायाला सुद्धा बऱ्यापैकी खाज सुटते आहे. कृपया उपाय सुचवावा.
... स्मिता फडके, कराड
उत्तर : गरोदरपणामुळे शरीरात हॉर्मोन्सचे असंतुलन झाल्यावर अशा प्रकारची लक्षण पाहायला मिळतात. सध्या नाकाला संतुलन राधा फेस तेलासारख्या तेलाने रोज हलक्या हाताने मसाज करावा. रात्री झोपताना नाकाला संतुलन राधा फेस तेल वरून खाली हलक्या हाताने लावावे. रोज अनंत सॅन व संतुलन पित्तशांती गोळ्या घेण्यास सुरुवात करावी. संतुलन गर्भसंस्कार चिकित्सा यासाठी फायदेशीर ठरू शकेल. वैद्यांच्या सल्ल्याने मासानुमासिक औषधे घेतल्यास त्या त्या महिन्यात होणारे चुकीचे बदल कमी करण्यासाठी यश मिळू शकते. रोज पायाला संतुलन पादाभ्यंग घृत लावून पादाभ्यंग करण्याचा फायदा मिळू शकेल.