

Ayurvedic Solutions for Joint Pain
Sakal
माझ्या बहिणीला सांधेदुखीचा फार त्रास होतो आहे. पाण्यात काम केल्यावरती हात सुन्न होतात; बोटांवरती, मनगटावरती सूज येते. कधी कधी गुडघेसुद्धा खूप दुखतात. थंडीच्या दिवसात तर तिला फारच त्रास होतो. कृपया काय पथ्य व उपचार करता येतील याच्याबद्दल मार्गदर्शन करावे.
- रघू पंडित, सोलापूर
उत्तर : इतक्या जास्त प्रमाणात त्रास होत असल्यास खरं वैद्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे जास्त उत्तम राहील. पण सध्या तरी बहिणीला रोज सकाळी सुंठ, गूळ, तूप असे एकत्र मिश्रण करून छोट्या आकाराची गोळी अनशा पोटी नक्की घ्यायला सांगावी. तसेच रोज सगळ्या सांध्यांना संतुलनचे शांती तेल हलक्या हाताने नक्की लावावे. संतुलनच्या वातबल गोळ्या, प्रशांत चूर्ण व पुनर्नवास हे नियमित घेतल्याचा फायदा दिसू शकेल. स्त्रियांमध्ये सांधे दुखी करता योनिपिचू चा ही अप्रत्यक्ष लाभ होताना दिसतो. रोज न चुकता खारीक पूड घालून उकळून दूध घ्यायला नक्की सांगावे. शक्यतो आहारामधून कोबी, फ्लॉवर, शिमला मिरची, वांगी, चवळी व आंबवलेले पदार्थ टाळलेलं जास्त उत्तम राहील. संतुलनचे पंचकर्म करून शरीर शुद्धी व हाडांचे व सांध्यांचे आरोग्य सुधारण्याकरता आयुर्वेदिक उपचार घेतलेले जास्त उत्तम राहतील.