Health Tips For Students : तर काय...?

Student Health: विद्यार्थ्यांच्या अभ्यासामुळे ताण, झोपेचा अभाव व आहारातील असंतुलन वाढत आहे. आयुर्वेदिक तेल, संतुलन पंचामृत, सूर्यनमस्कार व प्राणायामामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारता येते.
Health Tips For Students

Health Tips For Students

sakal

Updated on

मी बारावीची विद्यार्थिनी आहे. सध्या मला अभ्यासाचा फार कंटाळा येतो. क्लास, शाळेमध्ये मला बसल्याजागी झोप लागते. डोकंही दुखतं. अभ्यासात मन लागण्यासाठी काय करता येऊ शकेल? कृपया सुचवावे.

- गीता गोखले, पुणे

उत्तर ः सध्याच्या काळात अभ्यासाचा अवाजवी ताण विद्यार्थी व त्यांचे आई-वडील घेत असतात. यामुळे आहार व झोप या दोन्हींमध्ये अनेकदा चालढकल केली जाते. रात्री वेळेवर झोपायला जाणं गरजेचं असतं. पुरेशा आणि योग्य वेळेला झोप लागण्याकरिता रोज रात्री झोपताना नाकामध्ये साजूक तुपाचे किंवा नसस्यानसारखे तुपाचे दोन तीन थेंब नक्की टाकावेत. तसेच संतुलन ब्रह्मलीन तेलाचेही चार पाच थेंब टाळूवरती नक्की लावून झोपावे. सकाळी उठल्यावरती दहा पंधरा मिनिटं तरी वेळ काढून चार पाच सूर्यनमस्कार घालणे, प्राणायाम करणे हे दिवसभर अभ्यासात मन लागायला मदत करू शकेल. रोज न चुकता तीन ते चार भिजवलेले बदाम खाणे, ब्राह्मी, शंखपुष्पी वगैरेसारखे मेंदूला पोषक व स्मृतिवर्धक वनस्पतींनी तयार केलेले संतुलन ब्रह्मलीन सिरप घेणे शक्य असल्यास ब्रह्मलीन घृत घेणे व संतुलन अमृतशर्करायुक्त पंचामृत घेणे मदत करू शकेल. ताकद व प्रतिकारशक्ती व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने रोज संतुलनचे च्यवनप्राश घेणे व दुधामधून संतुलन चैतन्य कल्प घेण्याचा फायदा होऊ शकेल. अभ्यासाला एकाच जागी खूप तास बसून राहण्यापेक्षा प्रत्येक तासात पन्नास मिनिटे अभ्यास व उरलेले दहा मिनिटे चांगले स्वास्थ्य संगीत ऐकणे किंवा थोडे घरातल्या घरात चालणे हे एकाग्रता सुधारण्यासाठी मदत करू शकेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com