आयुर्वेदिक पंचकर्म

Toxins म्हणजे विषारी पदार्थ. शरीरातील चयापचय क्रियेमधून उरलेले आणि शरीरामध्ये हानिकारक असलेले व साठून राहिलेले विषारी पदार्थ म्हणजेच शरीरातील अशुद्धी.
ayurvedic significance toxins lifestyle diseases
ayurvedic significance toxins lifestyle diseasesSakal

- डॉ. मृण्मयी मांगले

चुकीच्या जीवनशैलीमुळे जुनाट आजारांचे वाढत जाणारे प्रमाण, सतत चुकीचे अन्न वेळी अवेळी खाल्ल्यामुळे, वाढत्या प्रदूषणामुळे आणि वाढत असलेल्या मानसिक तणावामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक अशुद्ध पदार्थ, toxins साठून राहतात आणि त्यामुळे जुनाट आजारांचे प्रमाण वाढते.

Toxins म्हणजे विषारी पदार्थ. शरीरातील चयापचय क्रियेमधून उरलेले आणि शरीरामध्ये हानिकारक असलेले व साठून राहिलेले विषारी पदार्थ म्हणजेच शरीरातील अशुद्धी. शरीरात साठलेल्या अतिरिक्त अशुद्धीमुळे ॲलर्जी, त्वचेचे विकार, लठ्ठपणा, दमा, संधिवात इथपासून ते ऑटोइम्युन आजार, कर्करोग हे आजारसुद्धा होऊ शकतात.

यांमुळेच आजच्या जगात डिटॉक्स ही संकल्पना फार प्रसिद्ध होत आहे. डिटॉक्स हे detoxification या शब्दाचे संक्षिप्त रूप आहे, ज्याचा अर्थ शरीरातील toxins (अशुद्धी/विषारी पदार्थ) बाहेर काढून शरीराला त्यापासून मुक्त करणे असा होतो. आज आपण आयुर्वेदिक detox म्हणजेच पंचकर्म याबद्दल जाणून घेऊयात.

पंचकर्म म्हणजे काय?

पंचकर्म हा शरीर, मन आणि चेतनेस शुद्ध आणि पुनरुज्जीवित करणारा एक उपचार कार्यक्रम आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् आतुरस्य व्याधी परिमोक्षणम्। पंचकर्म आजारी व्यक्तीला निरोगी करते; तसेच आजार नसलेल्या व्यक्तीच्या शरीराची आणि मनाची शुद्धी करते; तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

पंचकर्म प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांची विशिष्ट घटना आणि विशिष्ट विकार लक्षात घेऊन वैयक्तिकरित्या केले जाते, त्यामुळे त्याचे बारकाईने निरीक्षण आणि पर्यवेक्षण करणे आवश्यक आहे. पंचकर्म याचा शब्दशः अर्थ ‘पाच कर्म’ असा होतो.

पंचकर्म तीन टप्प्यांमध्ये केले जाते.

१ पूर्वकर्म

२ प्रधान कर्म

३ पश्चात कर्म

पंचकर्म कोणी करून घ्यावे आणि कोणी करून घेऊ नये?

कोणी करून घ्यावे? : - जे बहुदोषी आहेत म्हणजेच खूप दोष एकत्र येऊन जे व्याधी ग्रस्त आहेत असे लोक.

सतत औषधोपचार घेऊनही जे व्याधीमुक्त होत नाहीत, अशांनी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊन आपल्या व्याधीनुसार पंचकर्म करून घ्यावे.

विविध ऋतूंनुसार जसा वातावरणात बदल घडतो, त्यानुसार शरीरातही बदल घडतात. त्या-त्या ऋतूनुसार शरीरातील दोषांमध्ये बदल होतात. वर्षाऋतूत वात अधिक, शरदात पित्त, तर वसंतात कफ या ऋतुनुसार होणाऱ्या दोषप्रकोपातून वाचण्यासाठी आचार्यांनी पंचकर्माचा (Panchakarma) सल्ला दिला आहे.

कोणी करून घेऊ नये? : क्षीण, बालक, गरोदर स्त्रिया व अती वृद्धांनी करून घेऊ नये.

पंचकर्माचे फायदे

- इंद्रिये बलवान होतात

- धातूंना स्थिरता येते

- जठराग्नी प्रदीप्त होतो

- तेज प्राप्त होते, बुद्धी निर्मळ होते

- आयुष्य दीर्घ होते, म्हातारपण उशिरा येते

जीवनशैलीतील बदलांमुळे होणारे आजार मधुमेह, pcod, Autoimmune आजार, त्वचेचे विकार, पोटाचे विकार, गट हेल्थ चांगली करणे यांसाठी पंचकर्म उपयुक्त ठरते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com