

Spinal health exercises home remedies
esakal
डॉ. मालविका तांबे
सध्याच्या काळात कामाचा ताणतणाव, सतत खुर्चीवरती एकाच जागी बसून राहणे, कामावरती जाण्याकरिता सतत प्रवास करणे, या सगळ्यामुळे पाठदुखी व कंबरदुखी ही समस्या साधारण पस्तीशी ते पन्नाशीच्या मधल्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात दिसायला लागलेली आहे.
संपूर्ण पाठीमध्ये मेरुदंड अर्थात पाठीचा कणा सगळ्यात महत्त्वाचा असतो. याची शारीरिक रचना आपल्या संपूर्ण हालचालींना आधार देण्याकरिता व सोपं करण्याकरिता असते. म्हणायला तर पाठीच्या कण्यामध्ये तेहतीस मणके असतात, पण प्रत्येक मणक्याचा आकार, त्याची संरचना आणि त्याचे उभार वेगवेगळे असतात. दोन मणक्यांच्या मध्ये एक गादीसुद्धा असते. या सगळ्यामुळे शरीराला आधार तर मिळतोच, पण शरीराची लवचिकतासुद्धा वाढते व तसेच तिथे असलेला संपूर्ण मज्जाधातू अर्थात नसा आणि स्पायनल कॉर्ड यांचं सगळ्यांचं संरक्षणसुद्धा होते. आपल्याकडे असं म्हणतात की, पाठीच्या कण्यात ताकद असली तर व्यक्ती कुठलेही कार्य व्यवस्थित करू शकतं.