Smart Tiffin Tips: नवीन पिढीसाठी पारंपरिक आहाराचा हेल्दी ट्विस्ट – आहारतज्ज्ञांचा टिफिनसाठी खास सल्ला!

Dietitian-approved modern lunchbox ideas with Indian meals for kids: पारंपरिक जेवणात पौष्टिकता कशी वाढवायची यावर आहारतज्ज्ञांचा टिफिनसाठी मार्गदर्शक सल्ला!
Smart Tiffin Tips
Smart Tiffin Tipssakal
Updated on

How to add a nutritious twist to traditional food: लवकरच शाळांना सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर मुलांना टिफिनमध्ये काय द्यावे, कोणते पदार्थ पोषक असतात, त्यांचे आरोग्यावर काय परिणाम होतात यावर मार्गदर्शन करण्यासाठी ‘सकाळ’तर्फे विशेष संवाद सत्र घेण्यात आले. त्यात आहारतज्ज्ञ डॉ. रेणुका माईंदे, डॉ. शीतल काटेकर आणि पालक प्रतिनिधी प्रवीणा दाढे यांनी विचार मांडले.

या संवादात आहारतज्ज्ञांनी बदलत्या जीवनशैलीत मुलांना कोणता आहार द्यावा, कोणत्या पदार्थांपासून दूर रहावे आणि पारंपरिक पदार्थांमध्ये काय चविष्ट बदल करता येतील, याची सखोल माहिती दिली.

बदललेल्या जीवनशैलीच्या परिणामांची माहिती देताना डॉ. काटेकर म्हणाल्या की, पारंपरिक पदार्थांची जागा आता फास्ट फूडने घेतली आहे. त्यामुळे लहान वयातच पचनाचे विकार, पोषणतत्त्वांची कमतरता, अगदी हार्मोनल बदलही दिसून येत आहेत. पूर्वी घरी आजी, आईकडून दिले जाणारी गूळ पोळी, शिळा भात, ताक हे पौष्टिक पदार्थ दुर्लक्षित होत चालले आहेत. बाजारात मिळणारे अन्न आरोग्यदायी वाटले तरी ते खरंच पोषक आहे का, हे तपासणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. माईंदे यांनी सांगितले की, बहुतांश वेळा आपण केवळ एक्सपायरी डेट बघतो, मात्र ‘फूड लेबलिंग’ वाचत नाही. फूड लिटरसी म्हणजे अन्नातील घटक समजून घेणे ही मुलांच्या आरोग्यासाठी गरजेची बाब आहे. मुले शिक्षकांवर खूप विश्वास ठेवतात. त्यामुळे शिक्षकांनाही फूड लिटरसीचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रविणा दाढे यांनी आईच्या भूमिकेतून मत मांडताना सोशल मीडियावरील फूड इन्फ्लुएंसर्सच्या चुकीच्या माहितीमुळे होणाऱ्या गोंधळाचा प्रश्न उपस्थित केला. इन्फ्लुएंसर्सच्या सल्ल्यावर विश्वास ठेवण्याआधी त्यांची शिक्षणपात्रता तपासणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

‘हेल्दी नाश्ता’ असा असावा

  • आहार हलका, पचायला सोपा आणि पोषणमुल्यांनी भरलेला असावा.

  • बेसन, चिला, उत्तपम, भाज्यांनी भरलेली उकलपेंढी, इडली, ढोकळा हे सहजपणे पचणारे व प्रथिने व फायबरने समृद्ध पदार्थ द्यावेत.

  • लाह्यांचा किंवा पोह्यांचा चिवडा, १०० ग्रॅम भाजलेले शेंगदाणे, फुटाणे त्यात ५० ग्रॅम मखाने आणि थोडा गूळ एकत्रित करून द्या.

  • कणकीचा लाडू, मुरमुऱ्याचा लाडू किंवा राजगिऱ्याचा लाडू हे पारंपरिक पदार्थ चांगले आहेत.

  • सफरचंद, संत्री किंवा केळी यासारखी फळे.

  • मुलांच्या इम्युनिटीसाठी चवनप्राश, आवळा, लिंबूपाणी देणे अधिक फायदेशीर ठरते.

  • गाजर व रताळ्याचे फ्रेंच फ्राईज, चना-पालक टिक्की, घरगुती चकली, चिक्की मुलांना आवडते.

  • भोपळ्याचा पराठा, खीर, पपईचा शिरा देता येतो.

भरपूर ऊर्जा देणारा असा आहार द्या

  • पोळी-भाजी, पुलाव, खिचडी हे पारंपरिक पर्याय योग्य.

  • पालक, पनीर किंवा बीट यांचा पराठा यात चव आणि पोषण असते.

  • झुणका, चटण्या, मेतकूट म्हणजे डाळीच्या चटण्या, भात हे पदार्थ.

  • दूध किंवा दह्यात कणीक भिजवून केलेली दशमी, राजमा पुलाव, सोयाबीन पुलाव, थालीपीठ, उसळ-पोळी देणे चांगले.

  • कारल्याची भाजी, खोबरे, गूळ, तीळ, शेंगदाणे टाकून चमचमीत बनवता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com