प्रश्न - आपल्याला करिअर किंवा उपजीविकेबाबत काही ध्येये साध्य करायची असतील, तर ते आपल्याला खूप व्यग्र ठेवतात. मग आत्म-साक्षात्कारासाठी वेळ कसा काढायचा?
सद्गुरू - सर्वप्रथम आपण आत्म-साक्षात्काराबद्दल तुमच्या किंवा कुणाच्याही मनातल्या कल्पना स्पष्ट करू या. तुमच्याकडे मोबाईल फोन आहे का? तुम्ही कॅमेरा वापरता का? तुम्ही तुमच्या जीवनात जे कोणतेही उपकरण वापरता, त्याबद्दल जितके जास्त माहिती असेल, तितक्या चांगल्या प्रकारे तुम्ही ते हाताळू शकता.