

Stay cool in heat: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तीव्र सूर्यप्रकाश आणि वाढत्या तापमानामुळे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे उष्माघात, थकवा, डिहायड्रेशन, डोकेदुखी आणि पोटाच्या समस्या वाढू शकतात. यामुळे शरीराला आतून थंड आणि हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही आहारात नैसर्गिक पदार्थांचा समावेश करू शकता. उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवण्यासाठी आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी पुढील ५ सुपरकूलिंग पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.