Heart Attack Alert: हार्ट अटॅक आल्यास आधी काय करावे? तज्ज्ञांचा घरी करण्यायोग्य सल्ला वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heart Attack Alert

Heart Attack Alert: हार्ट अटॅक आल्यास आधी काय करावे? तज्ज्ञांचा घरी करण्यायोग्य सल्ला वाचा

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या महिन्याभऱ्याआधीच रूग्णांना लक्षणे दिसायला सुरूवात होते. मात्र अनेकजण ही लक्षणे गांभीर्याने घेत नाहीत आणि त्यामुळे अनेकांना त्यांचा जीवही गमवावा लागतो. जवळपास प्रत्येक महिलेस हार्ट अटॅक येण्याआधीच ही लक्षणे दिसायला सुरूवात होते.

महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. वेळीच सावध होण्यासाठी महिलांनी ही लक्षणे ओळखणे गरजेचे असते. अलीकडेच हॉवर्ड हेल्थ इंस्टीट्यूटच्या केलेल्या अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की, ९५ टक्के महिलांना हार्ट अटॅक येण्याआधीच काही सुरूवाती लक्षणे दिसण्यास सुरूवात झाली होती. मात्र त्यांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला किंवा उपचार घेतला नव्हता.

हेही वाचा: Heart Line Palmistry: तळहातावरील तुटक रेषा दर्शवतात तुमची लव लाइफ; या लोकांना प्रेमात येतं अपयश

ही लक्षणे दिसल्यास समजा तुम्हाला हृदयाचा आजार आहे

महिलांमध्ये थकवा आणि झोपेचं संतुलन नसणे हे हार्ट अटॅक येण्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे.

श्वास घेण्यास त्रास होणे, कमजोरी येणे, चिकट घाम येणे, चक्कर येणे यांसारखी लक्षणेही दिसून येतात.

तर पुरुषांमध्ये छातीत दुखणे हे हार्ट अटॅक येण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे.

ही लक्षणे दिसताच पुरुषांनी आणि महिलांनीही त्वरीत डॉक्टरांकडे चेकअप करावे.

हार्ट अटॅक आल्यास काय करावे?

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्विसच्या मते, कुठल्याही व्यक्तीस हृदयविकाराचा झटका आल्यास रूग्णवाहिकेस कॉल करावा. हृदयविकाराचा झटका येताच अॅस्पिरीनची एक गोळी चावून खावी. काही व्यक्तीस मात्र अॅस्पिरीनची अॅलर्जी असू शकते. अशा व्यक्तीस ही गोळी देऊ नये. अॅस्पिरीन रक्त पातळ करत रक्ताचा प्रवाह सुरळीत करते. त्यामुळे रूग्णास आराम मिळतो.