ताडगोळ्याचा फायदा

उन्हात फिरून तहान लागली असेल, थकवा, अशक्तपणा जाणवत असल्यास हे ताडगोळे खाल्ल्यानंतर नक्की कमी किंवा दूर होईल.
benefit of tadgoli fruit summer health
benefit of tadgoli fruit summer healthsakal
Updated on
Summary

उन्हात फिरून तहान लागली असेल, थकवा, अशक्तपणा जाणवत असल्यास हे ताडगोळे खाल्ल्यानंतर नक्की कमी किंवा दूर होईल.

- डॉ. कोमल बोरसे

सध्या उन्हाळा चांगलाच सुरू झाला झाला आहे. रस्त्यावरून फिरताना रस्त्याच्या कडेने बसलेले नारळासारखी दिसणारे परंतु आकाराने छोटे असे स्टार गोळे खाल्लेत का? हे फळ म्हणजेच ताडगोळे. खाल्ले नसतील तर या उन्हाळ्यात खाऊन बघा.

उन्हात फिरून तहान लागली असेल, थकवा, अशक्तपणा जाणवत असल्यास हे ताडगोळे खाल्ल्यानंतर नक्की कमी किंवा दूर होईल. ताडगोळे फक्त थकवा जाण्यासाठी नाही तर याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. ताडगोळे हे अतिशय मऊ आणि रसदार असतात. त्यांच्यावर जाड साल असतं. ते काढणं मोठं कंटाळवाणं काम आहे.

मात्र एकदा का साल काढली तर आत रसदार पांढरे गरे म्हणजेच ताडगोळे असतात. ताडगोळे चवीला गोड असून प्रकृतीला थंड असतात. हे पाणीदार फळ असल्यामुळं ते कापायची गरज नसते. या फळाची प्रवृत्ती थंड असल्यामुळे उन्हाळ्यात खाल्ल्यास आरोग्यासाठी फायदाच होतो.

ताडगोळ्यांमधील घटक ः खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्त्व आढळतात. एकंदरीतच हे फळ शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतं.

पाल्म किंवा ताडाच्या झाडाला येणारं फळ म्हणजे ताडगोळा. याचं शास्त्रीय नाव बोरासस फ्लॅबिलिफर असं आहे. हे फळ भारतात महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. ताडाच्या झाडांची लागवड समुद्रकिनारी अधिक होते. ताडगोळ्यांना बंगालमध्ये याला ‘ताल’, तेलुगूत ‘ताती मुंजलू’, तमिळमध्ये ‘नुग्नू’, इंग्रजीत ‘आईस ॲपल’ तर हिंदीमध्ये ‘तारी’ या नावानं ओळखलं जातं.

पौष्टिक घटक

  • ताडगोळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम आणि फायबरचा साठा असतो.

  • शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्याचं काम करतं. यामुळे शरीराचं तापमानही नियंत्रणात राहतं.

  • उन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येकानं या फळाचं आवर्जून खावं. उष्णतेमुळं होणारी पोटातील जळजळ कमी होते.

  • उन्हामुळे लहान मुलांना आणि मोठ्यांना अनेकदा त्वचेवर पुरळ येतात, अॅलर्जी होते अशावेळी ताडगोळ्यांचा रस त्वचेवर, पुरळांवर लावल्यास आराम मिळतो.

  • उन्हाळ्याच्या अनेकांना उन्हाळी लागते अशावेळी ताडगोळे खाल्ल्यास आराम मिळतो.

  • बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

  • कांजिण्या आलेल्या रुग्णांनी ताडगोळे खावेत. त्यामुळं कांजण्यांनी शरीराला येणारी खाज कमी होते.

  • शरीरातील साखरेची पातळी संतुलीत राहते. हे खाल्ल्यानं अधिक भूक लागत नाही, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवता येते.

ताडगोळे आपण फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतो. साल न काढता फ्रीजमध्ये ठेवल्यास ताडगोळे अनेक दिवस टिकतात. उन्हाळ्यात मुलांच्या बाहेर खेळायला पाठविण्यापूर्वी हे फळ खाऊन पाठवावे. किडनीच्या आरोग्यासाठी ताडगोळे अतिशय उपयुक्त असून शरीरातील नको असलेली द्रव्ये याच्या सेवनाने शरीराबाहेर फेकली जातात. या फळाचे आणखी गुणधर्म पुढील लेखात पाहूयात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com