Benefits of Sarvangasana : हात आणि खांद्यांच्या मजबूतीसाठी फायदेशीर आहे सर्वांगासन, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

Benefits of Sarvangasana : शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि उत्तम आरोग्य सुनिश्चित करण्यात योगा महत्वाची भूमिका बजावते.
Benefits of Sarvangasana
Benefits of Sarvangasanaesakal

Benefits of Sarvangasana : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित योगा करणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. योगाचा नियमित सराव करणे मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि उत्तम आरोग्य सुनिश्चित करण्यात योगा महत्वाची भूमिका बजावते. योगासनांमध्ये अनेक आसनांचा समावेश असतो.

या आसनांपैकीच एक असलेले सर्वांगासन आरोग्यासाठी उपयुक्त आहे. सर्वांगासनाचा दररोज सराव केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि मनासिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी फायदा होतो. या आसनामध्ये संपूर्ण शरीर खांद्यावर संतुलित केले जाते. हा संपूर्ण शरीराचा एक प्रकारचा व्यायाम आहे, जो अनेक स्नायूंच्या गटावर काम करतो. आज आपण सर्वांगासन करण्याची योग्य पद्धत आणि आरोग्यदायी फायदे कोणते? ते जाणून घेणार आहोत.

Benefits of Sarvangasana
Benefits Of Sukhasana : मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी फायदेशीर सुखासन, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

सर्वांगासन योगासन करण्याची योग्य पद्धत :

सर्वांगासन हे योगासन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. योगा तज्ज्ञांच्या मते कोणतेही योगासन करताना ते योग्य पद्धतीने करायला हवे, तरच त्या आसानाचे सर्वोत्तम फायदे आपल्याला मिळतात. या आसनाचा सराव करणे तुलनेने कठीण असू शकते. जर तुम्ही हे आसन पहिल्यांदाच करत असाल तर, योगातज्ज्ञाची मदत घ्या.

हे योगासन करताना सर्वात आधी योगा मॅटवर पाठीवर झोपा. त्यानंतर, तुमचे दोन्ही पाय वरच्या दिशेने ९० अंशापर्यंत न्या. या स्थितीमध्ये तुमचे पाय डोक्याच्या रेषेत सरळ ठेवा. त्यानंतर, तुमची हनुवटी छातीला स्पर्श करेल अशा प्रकारे शरीर सरळ ठेवा. काही सेकंद या स्थितीमध्य राहिल्यानंतर हळूहळू तुमच्या सामान्य स्थितीमध्ये परत या.

सर्वांगासन योगासन करण्याचे आरोग्यदायी फायदे

  • या योगासनाचा दररोज सराव केल्याने शरीरातील सर्व प्रमुख स्नायू सक्रिय होतात.

  • सर्वांगासनाचा नियमित सराव केल्याने शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.

  • या आसनाचा दररोज सराव केल्याने थायरॉईड आणि पॅराथायरॉईडच्या ग्रंथींचे कार्य सुधारण्यास मदत होते.

  • सर्वांगासन दररोज केल्याने हात आणि खांदे मजबूत होतात आणि पाठीचा मणका लवचिक बनतो.

  • या योगासनाचा दररोज सराव केल्याने बद्धकोष्ठता आणि अपचनसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Benefits of Sarvangasana
Benefits Of Gomukhasana : उत्तम स्ट्रेचिंगसाठी आणि तणाव मुक्तीसाठी दररोज करा गोमुखासन, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com