हिवाळ्यात डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहारात समावेश करा 'या' 5 फूडचा l Best Food For Eye Health | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eye care health tips

हिवाळ्यात डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहारात समावेश करा 'या' 5 फूडचा

आपण फिट रहावे म्हणून व्यायाम करतो. प्रसंगी जीम, मैदानी खेळ, योगा करतो. पण शरीराच्या प्रत्येक पार्टसाठी आपण वेगळा डायट करत नाही. शरीराचा सगळ्यात महत्वाचे इंद्रिय म्हणजे डोळे. डोळ्यांचे (Eye)आरोग्य उत्तम जीवनशैली आणि उत्तम हारावर अवलंबून असते. तुमचा आहार जितका अधिक पौष्टिक असेल तितके तुमचे डोळे निरोगी राहतात. केवळ दृष्टी चांगली राहावी अस नाही तर डोळ्यांशी संबंधित विविध आजार होऊ नये म्हणून आहारही चांगला ठेवणे गरजेचे आहे. हिवाळ्यात बाजारात गाजर (Carrots) मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. याचा डोळ्यालाही चांगला फायदा होतो. गाजरासोबतच इतरही असे काही पदार्थ आहेत. ज्याचा वापर करून आपण डोळ्यांचे आरोग्य (Health) चांगले ठेवू शकतो. कोणते चला जाणून घेऊया.(Best Food For Eye Health)

बदाम (Almonds)

तुम्ही आहारात नियमित बदामाचे सेवन केले पाहिजे. यात व्हिटॅमिन ई असते. याचा डोळ्यांना देखील फायदा होतो. डोळ्यांवरील धुरासारख्या मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव कमी होण्यास मदत होते.

हेही वाचा: डोळस व्हा! स्क्रीन टाईमच्या वाढत्या युगात अशी घ्या डोळ्यांची काळजी

पपई (Papaya)

पपई संदर्भात अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे अनेकजन पपई खाण्यास नापसंदी दर्शवतात. मात्र पपईत असलेले व्हिटॅमिन-सी डोळ्यांना आवश्यक असलेले अँटीऑक्सिडंट पासून संरक्षण करतात. यासाठी पपई खाणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

संत्री (Orange)

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण असते. तुम्ही नियमित संत्र्याचा रसाचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे. ताजी फळे डोळ्यांच्या रक्तवाहिन्याही निरोगी ठेवतात. तसेच मॅक्युलर डिजेनेरेशन सारख्या डोळ्यांच्या आजारांचा धोका कमी करतात.

गाजर (Carrots)

डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी गाजराचा उपयोग चांगला होतो. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते. हे डोळ्यांना होणारे संसर्ग आणि गंभीर आजारांपासून वाचवते.

मासे (Fish)

मासे साल्मन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात. माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. ते डोळ्यांचा मागील भाग, डोळयातील पडदा निरोगी ठेवतात आणि त्यांच्या सेवनामुळे डोळ्यांना कोरडेपणा येत नाही.

Web Title: Best 5 Foods For Eyes Care Health Tips Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :EyeHealth Minister'food