Eye Care : डोळ्यांची काळजी...!

गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन असते, त्याचे शरीरात ‘व्हिटॅमिन-ए’ मध्ये रूपांतरित होते. ‘व्हिटॅमिन-ए’ दृष्टिसाठी चांगले आहे.
best eye care food fruits vitamin a carrot vegetable
best eye care food fruits vitamin a carrot vegetableSakal
Updated on

- विकास सिंह

डोळे आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहेत. हे शरीराला पाचपैकी एक म्हणजे पाहण्याची संवेदना निर्माण. यासाठी डोळे सुरक्षित आणि निरोगी ठेवणे महत्त्वाचे आहे.डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी पहिले पथ्य म्हणजे संतुलित आहार घेणे. आपल्याला लहानपणापासून निरोगी दृष्टिसाठी गाजर खाण्यास सांगितले जाते.

गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन असते, त्याचे शरीरात ‘व्हिटॅमिन-ए’ मध्ये रूपांतरित होते. ‘व्हिटॅमिन-ए’ दृष्टिसाठी चांगले आहे. बीटा कॅरोटीन गाजरासह सर्व पिवळ्या, केशरी आणि हिरव्या पालेभाज्या आणि फळांमध्ये आढळते.

साधारणपणे शिफारस केलेला दुसरा नियम म्हणजे २०-२०-२० नियम. याचा अर्थ प्रत्येक वीस मिनिटांच्या स्क्रीन वेळेसाठी, तुम्ही २० फूट दूर असलेल्या वस्तूकडे २० सेकंद पाहणे. हे आपल्या डोळ्यांना आराम करण्यास थोडा वेळ देते.

best eye care food fruits vitamin a carrot vegetable
Home Remedy For Eye Pain : लॅपटॉप, मोबाईलमुळे डोळे दुखतात, या घरगुती उपायांनी दूर करा डोळ्यांचा थकवा!

त्याचबरोबर अधू झालेली दृष्टी, पाणीदार किंवा कोरडे डोळे आणि डोळ्यांवरील ताण टाळण्यास मदत होते. दृष्टी चांगली ठेवण्याचा तसेच डोळ्यांचे संरक्षण करण्याचा एक मार्ग म्हणजे सनग्लासेस घालणे. विशेषतः: पोलरॉइड सनग्लासेस अनेक बाजूंनी येणारा प्रकाश फिल्टर करतात. यामुळे डोळ्यांवर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता कमी होते.

डोळ्यांचे रक्षण करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे धूम्रपान सोडणे. अभ्यासातून असे दिसून आले आहे, की धूम्रपान करणाऱ्यांमध्ये नेत्रगोलकाच्या मागे बसलेल्या महत्त्वपूर्ण मज्जातंतूला इजा होण्याची जास्त शक्यता असते, ज्याला ऑप्टिक नर्व्ह म्हणतात.

best eye care food fruits vitamin a carrot vegetable
Eye Infection : जिल्ह्यात डोळ्यांच्या साथीची लागण; 100 रुग्णांमागे 10 ग्ण साथीचे

या स्थितीला काचबिंदू असे म्हणतात आणि यामुळे दृष्टी पूर्णपणे नष्ट होऊ शकते. काही वेळा, आपण चांगली दृष्टी राखण्यासाठी काही शारीरिक व्यायाम देखील करू शकता. सर्वांत सोप्या मार्गांपैकी एक म्हणजे पामिंग.

योगाभ्यासातील आरोग्यदायी सराव म्हणूनही त्याची ओळख आहे. तुम्हाला फक्त तुमचे तळवे एकत्र घासायचे आहेत आणि त्यांना उबदार करावयाचे आहे आणि नंतर तुमचे तळवे तुमच्या बंद डोळ्यांवर ४-५ सेकंदांसाठी झाकून ठेवा. हे डोळ्याभोवतीच्या स्नायूंना आराम करण्यास मदत करते, थकवा कमी करते आणि तुम्हाला विश्रांतीची भावना देते.

best eye care food fruits vitamin a carrot vegetable
Pune Crime : व्यापाऱ्यावर गोळीबार करणार्‍या आरोपींकडून दोन पिस्तुलांसह ३१ जिवंत काडतुसे जप्त

तुम्ही तुमच्या डोळ्यांना अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करून त्यांना चांगला व्यायाम देऊ शकता, त्यामुळे दृष्टी अधू होण्यापासून रोखण्यास मदत होईल. डोळ्यांच्या रेषेत हात ताठ करा. अंगठा उभा करून त्यावर २० सेकंद लक्ष केंद्रित करा. त्यानंतर, लक्ष थोडं दूर असलेल्या वस्तूकडे वळवा आणि अंगठ्याकडे केंद्रित करण्यापूर्वी २० सेकंद तेथे ठेवा.

डोळे आणि दृष्टी यांच्या संदर्भात आपल्या कौटुंबिक इतिहासाबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दृष्टीच्या संदर्भात काही समस्या आनुवंशिकतेने मिळतात. आपण वडिलधाऱ्यांची अशा कोणत्या समस्यां कुटुंबात कुणाला होत्या का यावर चर्चा केल्याने आपल्याला कोणत्या डोळ्यांच्या स्थितीचा धोका असू शकतो याची स्पष्ट कल्पना येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com