Protein Source : प्युअर व्हेजिटेरियन्ससाठी प्रोटीनचा उत्तम सोर्स ठरतील या 6 भाज्या

तुम्हाला वेगळे काही खाण्याची गरज नाही तर प्रोटीनची कमतरता तुम्ही या ६ प्रकारच्या भाज्या खाऊनच भरून काढू शकता.
Protein Source
Protein Sourceesakal

Protein Source : इतर खाद्यपदार्थांच्या तुलनेत मांस आणि अंड्यांमध्ये सर्वाधिक प्रोटीनची मात्रा असते असा लोकांचा सर्वसामान्य गैरसमज असतो. प्रोटीनच्या कमतरतेमुळे तुमचे शरीर कमकुवत होऊ शकते. जे शुद्ध शाकाहारी असतात त्यांना मांस मटन अजिबात चालत नाही. मग अशांना शरीरात प्रोटीनची कमतरता भरून काढण्याचा स्त्रोत कोणता? त्यासाठी तुम्हाला वेगळे काही खाण्याची गरज नाही तर प्रोटीनची कमतरता तुम्ही या ६ प्रकारच्या भाज्या खाऊनच भरून काढू शकता. चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

प्रोटीन मिळवण्यासाठी काय खावे?

पालकमध्ये मोठ्या प्रमाणात न्यूट्रियंट्स असतात. एक कप शिजवलेल्या पालकमध्ये सुमारे 5.3 ग्रॅम प्रटीन असते. तुम्ही पालकचा वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या डाएटमध्ये समावेश करून घेऊ शकता. प्रोटीनशिवाय त्यात लोह आणि कॅल्शियमसारखे घटकही मोठ्या प्रमाणात आढळतात.

वाटाणे खा

व्हेज प्रोटीनच्या उत्तम सोर्सपैकी एक म्हणजे वाटाणे. 100 ग्रॅम वाटाण्यामध्ये सुमारे पाच ग्रॅम प्रोटीन असते. म्हणजेच मूठभर वाटाण्यात तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळेल. तुम्ही वाटाणे उकळून किंवा त्याची भाजी करून किंवा सॅलड बनवूनही खाऊ शकता.

Protein Source
घरच्या घरी बनवा Veg Keema Matar; येईल हाॅटेलसारखी चव

मशरून खा

मशरूम हे चवदार शाकाहारी गोष्टींपैकी एक असून हासुद्धा प्रोटीनचा एक उत्तम सोर्स आहे. हे स्वादिष्ट असण्यासोबतच हेल्दी देखील आहे. एक कप मशरूममध्ये सुमारे तीन ग्रॅम प्रोटीन असते.

ब्रोकली

ब्रोकोली हे सुपरफूड असून यात जवळपास सगळ्यात पोषक तत्वांचा समावेश आहे. 100 ग्रॅम ब्रोकोलीमध्ये सुमारे 2.8 ग्रॅम प्रोटीन असते, प्रोटीनचा हा उत्तम सोर्स मानला जातो. (Vegetable)

Protein Source
Best Protein Foods : High Protein साठी नॉनव्हेजच कशाला खायला हवं? हे शाकाहारी पदार्थ काय कमी नाहीत!

फ्लॉवर

ब्रोकोलीप्रमाणेच, शाकाहारी पण प्रोटीनयुक्त पदार्थ शोधणाऱ्यांसाठी फुलकोबी हा उत्तम पर्याय आहे. 100 ग्रॅम फुलकोबीमध्ये सुमारे दोन ग्रॅम प्रोटीन असते.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून कुठल्याही आजारासाठी या भाज्या पर्याय असू शकत नाहीत. तेव्हा अधिक माहितीसाठी कायम तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com