
Bloating: पोटात वायू साचल्याची भावना येण्याची अनेक कारणे असू शकतात. पचनाचे विकार हे त्यातले प्रमुख कारण आहे. पोटावर झालेली शस्त्रक्रिया, आहारातील दोष अथवा मानसिक तणाव अशा कारणांमुळेसुद्धा पोटात वायू धरला आहे, अशी स्थिती वा भावना होऊ शकते. ढेकर येणे, वारा सरणे किंवा पोटात अस्वस्थ जाणवणे, अशा प्रकारच्या तक्रारी रुग्ण करतो.