

Actress Bhagyashree Shares an Easy Natural Wellness Tip for PMOS
sakal
Bhagyashree Reveals How Mulethi Water May Help Balance Hormones: बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्री अभिनयाव्यतिरिक्त नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही आरोग्यविषयक माहिती, टिप्स आणि हेल्दी रेसिपीज शेअर करत असते. इतक्यातच महिलांच्या आरोग्यविषयक आणि प्रकर्षाने बोलल्या जाणाऱ्या एका आरोग्य समस्येचं नाव बदललं आहे. महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणारा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS), त्याचं नाव आता पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम (PMOS) असं झालं आहे. या आरोग्य समस्येवर तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने घरगुती, सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे.