
श्रेया देशमुख
फुफ्फुसे हे शरीराचा एक महत्वाचा अवयव आहे. जे श्वासोच्छवसाचे कार्य करतात, मात्र फुफ्फुसांचे आरोग्य खराब झाल्यास श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे थकवा येणे, अशक्तपणा जाणवे, खोकला, कफ,यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
अनेकवेळा धूळ, विषारी वायू, कफ, सिगारेटचा धूर, प्रदूषण, बॅक्टेरिया आणि रसायने आदींमुळे फुफ्फुसांमध्ये घाण जमा होते. यामुळे शरीरास फुफ्फुसाचे आजार उद्भवू शकतात. ही साचलेली घाण काढण्यासाठी पुढील काही आसनांचा सराव करु शकता.