
मी बॅँकेत काम करतो, मला सतत संगणकावर काम करावे लागते, त्यामुळे माझ्या डोळ्यांवर ताण येतो व माझी पाठ सतत दुखते. कृपया यासाठी काय कराव हे सुचवावे.
... आनंद दांडे, पिंपरी-चिंचवड
उत्तर : संगणकावर काम करणाऱ्याला पाठीची व डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी रोज नियमाने खऱ्या गुलाबपाण्याच्या घड्या ठेवणे सुरू करावे, तसेच रोज रात्री झोपताना एक एक थेंब संतुलन सुनयन तेल नक्की घालावे. संतुलन सॅन अंजन क्लिअर हेही नियमाने स्नानानंतर घालणे सुरू करावे. पाठीच्या कण्याचे आरोग्य नीट राहण्यासाठी नियमाने संतुलन कुंडलिनी सिद्ध तेलासारखे तेल हलक्या हाताने आठवड्यातून २-३ वेळा पाठीच्या काण्यावर जिरवावे.
तसेच संतुलन वातबल गोळ्या, मॅरोसॅनसारखे रसायन नियमित घेण्याचा फायदा होऊ शकेल. एकूणच बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते तसेच त्यांच्यावर कामाचा भरपूर ताणही असतो, त्यामुळे नियमाने संतुलन पित्तशांती गोळ्या घेणे, पादाभ्यंग करणे, तसेच शतानंत कल्प वा अनंत कल्प घालून दूध घेण्याचाही सर्वांगीण आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकेल.