Brain Aneurysm: मेंदूतील ‘टाइमबाँब’ : ॲन्युरिझम

Brain Aneurysm Warning Signs You Should Never Ignore: डोक्यातील रक्तवाहिनी कधी ठरू शकते धोकादायक? ॲन्युरिझमविषयी महत्त्वाची माहिती
Brain Aneurysm Warning Signs Know the Symptoms Causes Diagnosis and Treatment of This Potentially Life Threatening Condition

Brain Aneurysm Warning Signs Know the Symptoms Causes Diagnosis and Treatment of This Potentially Life Threatening Condition

sakal

Updated on: 

-डॉ. जयदेव पंचवाघ, मेंदू आणि स्पाइन सर्जन

मिसेस नेने माझ्या क्लिनिकमध्ये आल्या त्या प्रश्न घेऊन नव्हे, तर काय करायचं ते ठरवूनच! ‘‘डॉक्टर, माझ्या मानेतल्या डिस्कचं ऑपरेशन करा. आता हे दुखणं सहन होत नाही.’’ मिसेस नेने वय ४५ वर्षांच्या. हातात जाडजूड फाइल. गेल्या सहा महिन्यांत त्यांना तीन वेळा अचानक मानेत तीव्र वेदनांचा झटका आला होता. प्रत्येक झटका कोणतीही पूर्वसूचना न देता, अगदी अचानक आलेला. अचानक मानदुखी, डोक्याच्या मागे आणि खांद्यांमध्ये प्रचंड वेदना. सहन होण्यापलीकडच्या. प्रत्येक वेळी त्या आधी फॅमिली डॉक्टरकडे गेल्या, मग ऑर्थोपेडिक सर्जनकडे. मानेच्या मणक्याच्या एमआरआय केलेला. सी ४-५ लेव्हलला एक छोटा डिस्क घसरलेला फुगा दिसला. तो स्पायनल कॉर्डवर किंवा नर्व्ह्‌जवर दाब देत नव्हता. तरीही कुणालाही कुणालाही चटकन दिसेल अशी एकमेव बाब होती, म्हणून डायग्नोसिस ठरवून टाकलेलं: वारंवार होणारं डिस्क हर्निएशन. त्यांना पेनकिलर्स आणि सर्व्हायकल कॉलर देण्यात आली होती. तीन वेळा. प्रत्येक वेळी दुखणं कमी झालं आणि आयुष्य पुढे चालू राहिलं.

Loading content, please wait...