

A neurosurgeon recalls a dramatic Ganeshotsav emergency in which timely intervention, police assistance and advanced neurosurgical technology helped save a young brain-tumor patient.
Sakal
डॉ. जयदेव पंचवाघ मेंदू आणि स्पाइन सर्जन
‘त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि’ या शब्दांनी ज्याचं वर्णन गणपती अथर्वशीर्षात केलं गेलेलं आहे, त्या देवतेचा उत्सव कालपासून महाराष्ट्रभर सुरू झाला. या उत्सव काळात घडलेली एक घटना माझ्या मनावर कायमची कोरली गेलेली आहे. साधारण २१ वर्षांपूर्वीची घटना असेल. उत्सव ऐन भरात होता आणि साधारण संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास माझ्या डॉक्टर मित्राचा मला फोन आला. तो सांगत होता, की त्याच्या एका तरुण रुग्णाला एमआरआय सेंटरमध्ये घेऊन गेलेला आहे आणि तिथे एमआरआय केल्यावर त्या रुग्णाच्या मेंदूच्या अगदी आतल्या भागात, एक गाठ असल्याचं अचानकपणे निदान झालेलं आहे. या गाठीमुळे मेंदूमध्ये जे पाणी तयार होतं, त्या पाण्याच्या वाहण्याचा मार्ग अचानक अडला गेला आहे. कवटीच्या आत पाण्याचा दाब अचानक आणि प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे तो रुग्ण बेशुद्ध अवस्थेकडे झुकत चाललेला आहे.