
थोडक्यात:
भारतातील जवळपास ७६% स्तनाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला जातो, पण पुन्हा होण्याचा धोका कायम असतो.
वय, ट्यूमरचा आकार, लिम्फ नोड्सची स्थिती आणि जनुकांतील बदल यांमुळे प्रत्येक रुग्णाचा धोका वेगळा असतो.
आधुनिक हार्मोन-आधारित व लक्ष्यित उपचारांमुळे दीर्घकाळासाठी कर्करोग पुन्हा होण्याचा धोका कमी करून जीवनाचा दर्जा सुधारता येतो.
Women Health: स्तनाचा कर्करोग सर्वात सामान्य व प्राणघातक कर्करोग आहे, ज्याचा भारतातील महिलांवर परिणाम होतो. वाढती जागरूकता आणि वैद्यकीय प्रगतीमुळे भारतातील जवळपास ७६ टक्के स्तनाच्या कर्करोगाच्या केसेसचे आता सुरुवातीच्या टप्प्यात निदान होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग म्हणजे कर्करोगाची गाठ स्तनात किंवा जवळच्या लिम्फ नोड्समध्ये आढळते आणि शरीराच्या इतर भागात पसरलेली नसते. ते ०, १, २ किंवा ३ टप्प्यामधील असू शकते.पण यशस्वी उपचारानंतर देखील स्तनाचा कर्करोग पुन्हा होण्याचा धोका प्रमुख चिंतेचा विषय आहे.