जीवनमान-जीवनभान : ताण आणि संतुलन

दिसणाऱ्या-न दिसणाऱ्या ताणाची ओळख करून शरीर-मनाची लवचिकता वाढवण्याचा मार्ग; छोट्या सवयींनी संतुलन परत मिळवण्याचा जीवनभानाचा प्रवास
Stress Management is not about avoiding stress but building resilience through healthy daily habits.

Stress Management is not about avoiding stress but building resilience through healthy daily habits.

Sakal

Updated on

देवयानी एम., लाइफस्टाइल कोच

स्ट्रेस (ताण) म्हटलं की बहुतेकांना वाटतं खूप काम, आर्थिक अडचणी, नात्यांमधले वाद, दुर्धर आजार किंवा एखादी मोठी समस्या उद्‍भवणं. काहीतरी ‘मोठं’ घडलं की स्ट्रेस येतो असा आपला समज असतो; पण शरीर आणि मेंदूची भाषा वेगळी असते. ‘ज्या कोणत्याही गोष्टीमुळे शरीराला किंवा मनाला सतत परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं, तो ताण.’

आपला मेंदू शरीरामध्ये, तसंच बाह्य वातावरणात होणारे सूक्ष्म बदलही सतत ओळखत असतो आणि त्यांचं मूल्यमापन करत असतो. या बदलांच्या आधारे तो परिस्थिती सुरक्षित आहे की धोकादायक, याचा अंदाज घेऊन शरीराची योग्य प्रतिक्रिया निर्माण करतो. आयुष्यात काहीच विशेष बिघडलं नसतानाही माणूस थकलेला, चिडचिडा किंवा एकलकोंडा वाटू शकतो. कारण ताण नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. अनेकदा तो शांतपणे साचत राहतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com