

Simple Home Remedies That Actually Work to Reduce Body Heat in Summer and Help Cool the Body
sakal
Home Remedies to Reduce Body Heat Naturally: उन्हाळा सुरू झाला की बाहेरचं तापमान वाढतं, पण अनेकांच्या शरीरातली उष्णताही त्याच वेगाने वाढते. त्यामुळे डोळ्यांत जळजळ होणे, छातीत जळजळ होणे, अंगावर उष्णतेचे फोड येणे, सतत गरमी जाणवणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तळपायांची सतत जळजळ अशा अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. काही लोकांच्या शरीरात नैसर्गिकरित्या उष्णतेचं प्रमाण जास्त असल्याने हा त्रास उन्हाळ्यात अधिक जाणवतो. अशा वेळी शरीराला आतून थंडावा देणारे काही सोपे घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात.