

राज्य सरकारच्या कामा रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत एक ऐतिहासिक कामगिरी पार पडली आहे. प्राथमिक वंध्यत्व आणि गंभीर द्विपक्षीय ट्यूबल ब्लॉकेज असलेल्या ३३ वर्षीय महिलेमध्ये पहिले यशस्वी भ्रूण प्रत्यारोपण करण्यात आले. शासकीय रुग्णालयात प्रगत प्रजनन उपचार यशस्वीपणे राबविण्याचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.