
मधुमेह असलेल्या लोकांसाठी खजूर खाणे सुरक्षित आहे का, याबद्दल तज्ज्ञांचे मत आहे की खजूरमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असला तरी मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास त्याचा ग्लायसेमिक लोड कमी असतो. त्यामुळे खजूर मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेवर कमी परिणाम होतो.
Can diabetics eat dates safely: आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार निर्माण होत आहेत. यामुळे मधुमेहासारख्या समस्या निर्माण होत आहेत. मधुमेह असणाऱ्या लोकांना गोड पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी खूप वाढते, ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी लोकांच्या मनात अनेकदा प्रश्न असतो की खजूर मधुमेही खाऊ शकतात का? कारण ते गोड चवीचे असते, ज्यामुळे बहुतेक लोकांच्या मनात प्रश्न असतो की ते खाऊ शकते का? याबाबत डॉक्टर काय सांगतात हे जाणून घेऊया.