
Human metapneumovirus (HMPV) Homeopathic Maybe Effective: कोरोना महामारीतून अजून जग पूर्णपणे सावरलेले नाही त्यात आता चीनमध्ये अजून एका नवीन विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल माहित समोर येत आहे. चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोवायरस (HMPV) मोठ्या प्रमाणात पसरत असल्याच्या अनेक बातम्याही येत आहेत.
या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चीनमध्ये सर्व दवाखाने आणि स्मशान भूमी प्रचंड गर्दीने भरल्या आहेत. या विषाणूची लक्षणे कोरोनासारखीच असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे याची कोरोनासारखीच महामारी तर पुन्हा येणार नाही ना याची संपूर्ण जगाला आता भीती वाटू लागली आहे.