
आशा नेगी - लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत
कर्करोग हे नावच खूप मोठं आणि थरकाप उडवणारं आहे. कारण हा शब्द स्वतःसाठी आणि आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी ऐकणं आणि पचवणं खूप अवघड असतं. कर्करोग हा शब्द पचवणं तेवढं सोपं नसतं… आणि आजारी माणूस आपल्या घरातला असला की, ती लढाई फक्त त्याची राहत नाही – ती सगळ्यांची होऊन जाते.