
छत्रपती संभाजीनगर : शासकीय कर्करोग रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सिटी स्कॅनसाठी घाटी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. रोज किमान दहा रुग्ण पाठविले जातात. त्यामुळे लवकरच कर्करोग रुग्णालयातच सिटी स्कॅन मशीन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रुग्णांची सोय होणार आहे.