
आशा नेगी
कॅन्सर आणि त्याच्या उपचारांचा प्रवास सोपा नसतो; पण तो अवघडही नसतो. रुग्णाला सकारात्मक दृष्टिकोन, कुटुंबाचा आधार आणि योग्य वैद्यकीय मदत मिळाल्यास तो हा प्रवास अधिक सहजतेने पूर्ण करू शकतो. कॅन्सर रुग्णांसाठी मानसिक पाठिंबा हा उपचारांइतकाच महत्त्वाचा असतो. कॅन्सर हा केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आव्हानही आहे. रुग्णाला या प्रवासात सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी आणि त्याच्या मानसिक संतुलनासाठी कुटुंबीय, मित्रपरिवार, पाठिंबा अत्यावश्यक आहे.