

Asha Parekh Diet and Fitness
sakal
ASHA PAREKH DINNER: वाढत्या वयात शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. यासाठी रोजच्या जेवणात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणं महत्त्वाचं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी नुकतीच वयाच्या ८४ व्या वर्षी आपल्या रात्रीच्या जेवणाची खास झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या डिनरमध्ये सूप, सँडविच आणि ताज्या फळांचा ज्यूस यांचा समावेश असतो. त्यांचा हा साधा आणि हलका आहार सध्या चर्चेत आहे.