कार्डियाक अरेस्ट आणि हृदयविकाराचा झटका

हार्ट अटॅक आणि अचानक हृदयक्रिया बंद पडणे या दोन वेगळ्या अवस्था असून त्यांचा गोंधळ जीवघेणा ठरू शकतो. योग्य वेळी दिलेला सीपीआर हा अचानक कार्डियाक अरेस्टमध्ये जीवन आणि मृत्यू यामधील एकमेव दुवा ठरतो.
Difference Between Heart Attack and Sudden Cardiac Arrest

Difference Between Heart Attack and Sudden Cardiac Arrest

sakal

Updated on

डॉ. ऋतुपर्ण शिंदे

हृदयरोगतज्ज्ञ

रोहित ३२ वर्षांचा होता. तो नियमित व्यायाम करत असे, कधीही धूम्रपान केले नव्हते, त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोणताही ज्ञात हृदयविकार नव्हता. एका संध्याकाळी, जेवणानंतर मित्रांसोबत गप्पा मारत असताना तो अचानक जमिनीवर कोसळला. लोक जमा झाले. कुणीतरी पाणी शिंपडले, कुणी त्याला बसवण्याचा प्रयत्न केला, कुणीतरी नाडी तपासली; पण खात्री नव्हती. रुग्णवाहिका बोलावण्यात आली; पण ती १८ मिनिटांनी आली. रुग्णालयात पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले. नंतर ‘मोठा हार्ट ॲटॅक आला असावा’ अशी चर्चा झाली; पण रोहितचा मृत्यू हार्ट ॲटॅकमुळे नव्हे, तर अचानक हृदयक्रिया बंद पडल्यामुळे (Sudden Cardiac Arrest - SCA) म्हणजे हृदयाच्या विद्युत प्रणालीच्या अपयशामुळे झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com