
Early warning signs of uterine cancer in women: गर्भाशयाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर प्रकारचा कर्करोग आहे. गेल्या काही वर्षांत भारतात गर्भाशयाच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
गर्भाशयाचा कर्करोग हा प्रामुख्याने मानवी पॅपिलोमा विषाणू (HPV) च्या संसर्गामुळे होतो. एचपीव्ही विषाणू शरीरात बराच काळ राहतो आणि हळूहळू कर्करोगात रूपांतरित होऊ लागतो.
जर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे अगदी सुरुवातीलाच ओळखली गेली तर त्यावर उपचार करणे सोपे होऊ शकते. कारण हा आजार वाढत गेल्यास उपचार करणे कठीण होऊ शकते. खासकरून महिलांनी या लक्षकांकडे दुर्लक्ष करू नका.