
Cervical Cancer: महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या आजारामुळे अनेक महिलांचा जीव जात आहे. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) हा विषाणू या कर्करोगास कारणीभूत आहे.
एकूण नऊ प्रकारचे विषाणू गर्भाशयाच्या मुखाच्या देशातील ९८.४ टक्के कर्करोगासाठी जबाबदार आहेत. १५ ते ४४ वर्षे वयोगटातील महिलांना प्रभावित करणारा हा भारतीय महिलांमधील दुसरा सर्वात मोठा कर्करोग आहे. एचपीव्ही लस या आजारावर परिणामकारक असून ती महिलांना अनिवार्य करण्याची शिफारस तज्ज्ञांनी केली आहे.