

Traditional fasting practices and festivals during Chaturmas are closely linked with balanced nutrition, environmental awareness and holistic well-being.
Sakal
चातुर्मास म्हणजे चार महिने. वर्षाचे ऋतू सहा आहेत असे आपण मानतो. चैत्र-वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ-आषाढ ग्रीष्म ऋतू, श्रावण-भाद्रपद वर्षा ऋतू, आश्र्विन-कार्तिक शरद ऋतू, मार्गशीर्ष-पौष हेमंत ऋतू आणि माघ-फाल्गुन शिशिर ऋतू असे सर्वसाधारण ऋतुचक्र असते.
श्रावण-भाद्रपद वर्षा ऋतू असे म्हटले गेले असले तरी अलीकडचे काही दिवस व पलीकडचे काही दिवस मिळून पावसाळा साधारण चार महिने असतो. हा चार महिन्यांचा कालखंड चातुर्मास म्हणून ओळखला जातो. बहुतेक ठिकाणी चार ऋतू महत्त्वाचे समजले जातात. तीन-तीन महिन्यांचे चार ऋतू अशा तऱ्हेनेही वर्षाची विभागणी केलेली दिसते.