

Beyond Academics: Why Physical Fitness is as Important as Algebra
Sakal
डॉ. प्राजक्ता सहस्रबुद्धे, प्राध्यापक आणि सल्लागार, कार्डिओव्हॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी
भारतात लहान मुलांमधील स्थूलतेचे प्रमाण गेल्या दशकात लक्षणीयरीत्या वाढलेले दिसून येते. जागतिक स्तरावरही शारीरिक निष्क्रियतेचे प्रमाण हे ८१ टक्के इतके जास्त आहे. कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लहान मुलांच्या फिटनेसचे प्रमाण हे अनेकदा कौटुंबिक उत्पन्नाशी व्यस्त प्रमाणात असल्याचे दिसते. वाढलेला स्क्रीनटाईम, वेळेचा अभाव, शालेय वेळापत्रकाची मर्यादा, तसेच खेळ व व्यायामासाठी आवश्यक संधी आणि साधनांची कमतरता ही काही कारणे असतीलही; पण ही परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे. लहान वयातील स्थूलता आणि शारीरिक तंदुरुस्तीचा अभाव यामुळे प्रौढ वयात आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढते. या पार्श्वभूमीवर मुलांच्या दैनंदिन वेळापत्रकात नियमित व्यायाम आणि खेळ यांचा समावेश करणे हा एक प्रभावी प्राथमिक प्रतिबंधात्मक उपाय ठरू शकतो.