प्रश्न १ - आम्ही गेल्या आठ वर्षांपासून बाळ होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. बऱ्याच ठिकाणी उपचार घेतले. आययूआय व आयव्हीएफ हे उपचारही घेतले. स्त्रीबीजाची वाढ व्यवस्थित होत नाही, असे डॉक्टरांचे मत आहे. आम्हाला डोनेटेड ओव्हमसाठी जायची मुळीच इच्छा नाही. आयुर्वेदात यासाठी काही उपचार असले तर सुचवावेत.
- श्री. प्रवीण, पिंपरी
उत्तर - आयुर्वेदिक उपचार हे शरीराच्या मूळ चयापचय क्रियांवर काम करण्यासाठी यशस्वी ठरतात. स्त्रीबीज नीट तयार होत नसेल किंवा हॉर्मोन्सशी संबंधित इतर काही समस्या असल्या, गर्भधारणेसाठी व गर्भधारणा झाल्यावर गर्भाचा विकास व्यवस्थित व्हावा यासाठी आयुर्वेदिक उपचारांचा उत्तम उपयोग होताना दिसतो. सर्वप्रथम स्त्रीसंतुलनासाठी नियमाने फेमिसॅन सिद्ध तेलासारख्या तेलाचा पिचू रोज वापरायला सुरुवात करावी.
बरोबरीने संतुलन अशोकादी घृत, सॅन रोझ रसायन, स्त्री संतुलन कल्प घेण्याचा फायदा दिसू शकेल. कोरफड, अशोकसारख्या वनस्पती सुद्धा स्त्रीसंतुलनासाठी मदत करतात, त्यामुळे अशोकारिष्ट, संतुलन फेमिनाइन बॅलन्स आसव घेण्याचा फायदा दिसू शकेल. संपूर्ण उपचारांच्या माहितीकरता एकदा तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे म्हणजे कुठल्या प्रकारची औषधे. उपचार व पंचकर्म मदत करू शकेल याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन मिळू शकेल.