आरोग्याचे ‘बाळ’कडू : लहान मुले आणि ल्युकेमिया

लहान मुलांतील ल्युकेमियाची लक्षणे, जोखीम घटक आणि प्रकारानुसार होणाऱ्या गुंतागुंती; वेळेवर निदान, किमोथेरपी व बोन मॅरो ट्रान्सप्लांटमुळे वाढणारी बरे होण्याची शक्यता
childhood leukemia

childhood leukemia

Sakal

Updated on

डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ

बालकांत ल्युकेमिया या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक असून, त्याबाबत काही माहिती आपण गेल्या आठवड्यात बघितली. आता इतर काही गोष्टी बघू.

ल्युकेमियाच्या प्रकारानुसार लक्षणे आढळून येतात. सुरुवातीला रुग्णात असलेल्या सौम्य प्रकारच्या लक्षणांची तीव्रता नंतर वेगाने वाढत जाते. त्यात १) वजनात घट, २) अशक्तपणा, ३) सौम्य ताप, ४) हाडे किंवा सांधे दुखणे, ५) ॲनिमिया (हिमोग्लोबिनची कमतरता), ६) प्लेटलेट्सची निर्मिती घटल्याने थोडे खरचटले, तरी रक्तस्राव होणे, ७) जंतुसंसर्ग - तोंड येण्यापासून ते तीव्र न्युमोनियासारखे आजार उद्‍भवणे, अशी लक्षणे दिसून येतात. याशिवाय ल्युकेमियाच्या त्या- त्या प्रकारांनुसार अन्य काही लक्षणे आढळून येतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com