तिला मुक्त व्हायचंय! : सावर रे मना...

बालपणीच्या लैंगिक शोषणाच्या जखमा, कुटुंबीयांच्या अविश्वासाने वाढलेलं आयुष्यभराचं दु:ख; समुपदेशनातून ‘ट्रॉमा’ला शब्द देत मीनाचा स्वतःकडे परत येण्याचा प्रवास
The Invisible Trauma: Understanding Psychosomatic Pain and Childhood Abuse

The Invisible Trauma: Understanding Psychosomatic Pain and Childhood Abuse

Sakal

Updated on

डॉ. मृदुला आपटे, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट

मी ना पहिल्यांदा ऋताकडे समुपदेशनासाठी आली होती, तेव्हा तिच्या हातापायांत वेदना होत होत्या. पण तिचे वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल सामान्य होते. डॉक्टरांना मीनाच्या दुखण्यामागे कुठलेच वैद्यकीय कारण सापडत नव्हते. पण मानसिक स्वास्थ्यासाठीच्या समुपदेशनासाठी ‘केस हिस्ट्री’ घेताना, मीनाला व्यक्ती म्हणून समजून घेताना ऋताला समजले, की मीना मनातून खूप खोलवर दुखावली गेली आहे. ते बोलायला तिला फार अवघड जात आहे. ऋताने ठरवले की मीना या विषयाबाबत इतकी सावध आणि बंदिस्त आहे, त्यामुळे त्याबाबत जबरदस्तीने, खोदून खोदून शिरकाव करायचा नाही.

मीना काही सेशन्ससाठी आली. ती तिच्या कामाबद्दल, मित्र-मैत्रिणींबद्दल, आई-वडिलांशी असलेल्या नात्याबद्दल बोलत होती. खरे तर तिचे सगळे अगदी चांगले- ‘परफेक्ट’ चालले आहे असेच वाटत होते. इंग्लिशमध्ये ज्याला ‘टू गुड टू बी ट्रू’ म्हणतात ना, तसे!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com