आरोग्य‘चेतना’ : प्रलंबित वेदनेचा विळखा

प्रलंबित वेदना मेंदूची रचना, स्मृती, भावना आणि व्यक्तिमत्त्व बदलवतात; ‘क्रॉनिक पेन सिंड्रोम’मुळे जीवनमान खालावून नैराश्य, भीती आणि आत्महत्येच्या प्रवृत्तीपर्यंत परिणाम
Chronic Pain

Chronic Pain

Sakal

Updated on

डॉ. जयदेव पंचवाघ, मेंदू आणि स्पाइन सर्जन

प्रलंबित काळ वेदना होत राहणाऱ्या आजारांचं प्रतिनिधित्व करणारी ट्रायजेमिनल न्यूराल्जिया ही एक व्याधी. अशा प्रलंबित काळासाठी चालू राहणाऱ्या वेदनेला ‘क्रॉनिक पेन डिसॉर्डर’ म्हणतात. ही वेदना शरीराच्या कुठल्याही भागातली असू शकते. उदाहरणार्थ, वर्षानुवर्षं चालणारी कंबरदुखी, विशेषतः ह्रुमॅटॉइड प्रकारात बसणारी सांधेदुखी, डायबेटिस किंवा इतर कारणांमुळे शरीराच्या निरनिराळ्या भागात होणारी न्यूरोपथी, निरनिराळ्या प्रकारचे न्यूराल्जिया.... ही लांब यादी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com