

Ayurvedic Passion Fruit Detox Drink
sakal
Ayurvedic Detox Drink for Liver, Kidney and Gut: बऱ्याचदा सततचा थकवा जाणवणे, आळस आणि सुस्ती येणे आणि कधी कधी काम करण्याची इच्छाच नसणे, हे आपल्याला सामान्य वाटतं. पण हे सगळे शरीरात साचलेल्या टॉक्सिन्सचीही चिन्हे असू शकतात. बदलती जीवनशैली, अनियमित खाण्याच्या वेळा, प्रोसेस्ड फूड खाणं, दूषित पाणी, वाढतं प्रदूषण, अपुरी झोप यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे किडनी आणि लिव्हरमध्ये यामुळे विषारी घटक साचू लागतात. परिणामी हळूहळू शरीर कमकुवत होऊ लागतं आणि गंभीर आजार होण्याची शक्यता वाढू शकते.
प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. हंसाजी यांनी शरीरातील हे विषारी घटक बाहेर काढण्यासाठी घरच्या घरी बनवता येईल असा एक सोपा डिटॉक्स ड्रिंक सांगितला आहे.त्यांच्या मते हा ड्रिंक सलग १४ दिवस घेतल्यावर शरीर आतून स्वच्छ व्हायला मदत होते.